आरोपी - प्रकरण ३

  • 12.4k
  • 7.9k

प्रकरण तीन “किती पैसे होते त्यात?” - पाणिनी “काही सांगता येणार नाही पन्नास,पाचशे आणि दोन हजाराच्या च्या नोटा होत्या सगळ्या.” “आणि इतर खोक्यात काय होतं?” “मला माहित नाही. मी खोकं बंद केलं आणि कपाटाचं दार ही बंद केलं. मला भीती वाटते पटवर्धन सर, जर का काही चोरी दरोडा पडला घरात..... आम्ही दोघीच बायका घरी राहतो. म्हणजे लक्षात येत आहे ना... आणि अगदी दरोडा किंवा चोरीच सोडा जेव्हा एखादा माणूस अशा प्रकारची रोख रक्कम खोक्यांमध्ये भरून घरी ठेवतो तेव्हा त्याचा दुसरा अर्थ इन्कम टॅक्स चुकवण्यासाठी सुद्धा ही रक्कम ठेवलेली असू शकते. जर हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ला कळलं तर काय होईल?”