बॅग पॅक टूर टू कर्नाटका... - भाग 3

  • 5k
  • 1.9k

सकाळचे नऊ साडेनऊ वाजले होते.. आज पावसानेही उघडीप दिल्याने निसर्ग सकाळच्या उन्हात न्हाऊन निघाला होता ..अंदाजे तीन तासांचा प्रवास असल्याने आम्ही मस्तपैकी गाणी लावून बाहेरच्या निसर्गाचा आनंद घेत होतो..हाही प्रवास बऱ्यापैकी जंगलामधूनच चालू होता.. मध्ये मध्ये छोटी छोटी गावं आमचं स्वागत करत होती.. स्थानिक लोकांचे रोजचे दिनक्रम चालू झाले होते..मी सहज अनीलकडे बघितलं तर आमचे राजे गुडूप झाले होते संगीत आणि निसर्गाच्या सानिध्यात तास दोन तास कसे मोडले हे समजलेच नाही..मध्येच एका ठिकाणी ड्रायव्हरने गाडी थांबवली आणि मयुरेशला सांगितले की तुम्हाला जेवायचे असेल तर बाजूला जे छोटेसे हॉटेल आहे तिथं काहीतरी खाऊन घ्या नाहीतर अजून तास दोन तास तरी कुठेही