आरोपी - प्रकरण ५

  • 11.9k
  • 6.5k

प्रकरण ५ “मिस्टर पटवर्धन मला असं इथून लगेच निघता येणार नाही. मी माझ्या खोलीतून काही आणले नाहीये. म्हणजे अगदी दात घासायचा ब्रश टूथपेस्ट सुद्धा घेतलेलं नाहीये.” क्षिती म्हणाली “टूथ ब्रश आणि टूथपेस्ट पेक्षा इतर बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला करायच्येत. आपण निघतोय.” पाणिनी म्हणाला “तुझ्याबरोबर तू तुझी पर्स घेतलेली दिसतेस !” “हो. एवढ्या सगळ्या त्या गोंधळात आणि हातघाईच्या लढाईत मी पर्स मात्र घेतली.”-क्षिती “किती मोठी लढाई झाली?” - पाणिनी “शारीरिक लढाई नाही पण तोंडा तोंडी खूप झाली.”-क्षिती “आणि तू काय सांगितलंस त्यांना?” “मी काही सांगितलं नाही. तुम्ही जेवढं सांगायला सांगितलं होतं तेवढं फक्त सांगितलं. मी सांगितलं की मी काहीही पैसे चोरले