बॅग पॅक टूर टू कर्नाटका... - भाग 5

  • 6.7k
  • 1
  • 2.6k

भगवान शंकराचा वरदहस्त लाभलेले "मुरुडेश्वर" आपल्याला "याची देही याची डोळा!!" पाहायला मिळते याहून अधिक भाग्याची गोष्ट कोणती असावी..रात्रभर शांत झोप लागल्याने सकाळी लवकरच जाग आली.. आजचा दिवस तसा धावपळीचा नसल्याने थोडा वेळ आरामात बेडवर लोळत राहिले.. तेवढ्यात आमचे साहेब , "मी तयार आहे.तू ही उठ आणि तयार हो.. नाहीतर नंतर बीचवर ऊन लागेल आणि फोटो चांगले येणार नाहीत तुझे!"साहेबांना माझा वीक पॉईंट बरोब्बर माहीत आहे..आता अंथरुणातून उठून तयार होण्याशिवाय पर्याय नव्हता..तयार होऊन गेस्ट हाऊसच्या समोरचं असलेल्या बीचवर गेलो..भरतीची वेळ असल्याने समुद्राच्या लाटा किनाऱ्यावरील दगडांवर येऊन आपटत होत्या.फेसाळता समुद्र आपल्याचं तालात गुंग होता.. आजपर्यंत अनेक सागरकिनारे बघितले आहेत.. पण प्रत्येक ठिकाणचा