गुंफण : 12 “ कुठेतरी जाऊया ना रे आपण .” नीताने आळसावतच शेजारी पेपर वाचत पडलेल्या वरूणकडे नजर टाकली. “ काय झालं ?” पेपर मधून नजर न हटवता वरुण म्हणाला. तेव्हा रागारागाने नीताने त्याच्या हातातला पेपर ओढून घेतला. काहीतरी बिनसलय हे लक्षात येऊन वरुणने समजूतदारपणे तिच्याकडे मोर्चा वळवला. नीता आपल्याच