येवा कोंकण आपलोच असा.. - भाग १

  • 14.5k
  • 6.7k

हिरवी गर्द वनराई, अथांग सागर, पांढरे शुभ्र समुद्रकिनारे ,पर्यटकांना अंगाखांद्यावर खेळवणारा सह्याद्री!! आणि अस्सल मालवणी भोजन यासह मिळणारे कोकणातील आतिथ्यशील वातावरण !!"येवा कोंकण आपलोच असा" असं मनापासून स्वागत करणारी कोंकणी माणसं..यामुळे मालवण "पर्यटकांची पंढरी" झालं आहे. पर्यटकांच्या मौखिक प्रसिद्धीमुळे गोव्याच्या मद्य संस्कृतीला कंटाळलेल्या पर्यटकांचे लक्ष सिंधुदुर्गाकडे वळले..कोकण रेल्वे सुरु झाल्यामुळे मुंबई आणि इतर राज्यातील पर्यटकांना कोंकणाने आकर्षित केलं. शिवाय रस्त्यांची कामेही शासनाने पुढाकार घेऊन वेळीच केल्याने चारचाकीचा प्रवासही ब-यापैकी सुसह्य झाला.त्यामुळे मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील लोकांना कोकणात येणे सोपे झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शेतक-यांच्या हातात ऊस, कापूस अशा नगदी पिकांमुळे पैसा खेळू लागला होता. आर्थिक स्थिरता प्राप्त झाल्याने काहींना कोकण