साधारण तासाभरात आम्ही "नक्षत्र होम स्टे' जवळ पोहचलो. रस्त्यावर पाटी बघून रिक्षावाल्याने रिक्षा गल्लीत वळवली.. जसजशी रिक्षा पुढं पुढं जात होती तसतसा लाटांचा आवाज कानावर पडत होता..अचानक रिक्षा थांबली. रस्ता संपला होता. सामोरं अथांग निळा रत्नाकर!! अरे! होम स्टे कुठं आहे??रस्ता तर संपला!!तेवढ्यात समोरून एक काका आले. आम्ही त्यांना नक्षत्र होम स्टे कुठं आहे विचारलं.."हंयच उतराचा लागतला तुमका. रिक्षा रेतिसून पुढ जावूची नाय.डाव्या हाताक चलत जावा . थयच असा तुमचा ठिकाण.."बॅगा घेऊन आम्ही सगळे तिथंच उतरलो... बाकीचे पुढे झाले.लाटांचा जोरजोरात येणारा आवाज ऐकून माझे पाय मात्र तिथंच थबकले.तो गुंजारव मला तिथेच थांबायची गळ घालत होता. लाटांच्या संगीतात रत्नाकर माझं स्वागत