मंगळसूत्र

(11)
  • 19.3k
  • 1
  • 6.5k

माझी मोठी मुलगी तिसरीच्या वर्गात शिकत होती.. माझी पत्नी पुजा.. प्रणाली व प्रियांका लहान असतांनाच ती देवाघरी गेली..! हे दुःख पचवून मी पुर्ववत माझ्या कामाला लागलो.. पुर्ण जबाबदारी माझ्या एकट्यावर पडली होती.. दोन मुलींचे संगोपन.. त्यांचे शिक्षण.. आणि माझी नोकरी.. या विचारात असतांनाच.. खुप एकटे पणा जाणवायचा.. !खरं तर मला व माझ्या मुलींना माझ्या वयस्कर आईनेच सावरलं.. मुलींचा सांभाळ केला.. आई मुळेच निदान मुलींच संगोपन व्यवस्थित झालं.! माझ्या पत्नीच्या निधनानंतर मी माझ्या मुलींना सोडायला शाळेत जायचो..,