तासभर विश्रांती घेऊन आम्ही सिंधूदुर्गकडे रवाना झालो..मालवण मध्ये फिरण्यासाठी रिक्षा खूप चांगलं साधन आहे. स्वस्त आणि मस्त!!अजून एक, प्रवास करता करता तिथल्या स्थानिक लोकांशी आपल्याला संवादही साधता येतो.. तिथली त्यांची बोलीभाषा, त्यांचे सणवार, जवळपास बघता येण्यासारखी ठिकाणं सगळं सगळं माहिती करून घेता येतं..आम्हालाही असेच वेंगुर्लेकर काका भेटले.. मग काय बाहेर पडलो की काकांच्या घराच्या अंगणात उभं राहून काकांना हाक दिली की काका "इलो , इलो' म्हणत आम्हाला कुठंही घेऊन जायला तयार!!आम्ही किल्ला बघण्यासाठी मालवणात जात असताना काकांनी सांगितलं, "उद्या मालवणची जत्रा आसा.तुमका वेळ मिळालो तर याचो आनंद घ्या".... या जत्रेविषयी मी पुढे लिहणारचं आहे.. त्यामुळे आता सविस्तर सांगत नाही..पंधरा मिनिटातच