गुंतागुंत भाग ३ (अंतिम)

  • 7.1k
  • 3.7k

गुंतागुंत  भाग  ३ (अंतिम ) भाग २ वरून पुढे वाचा .......... करूणाला सकाळीच जाग आली. आता तिला फ्रेश वाटत होतं. ती उठून बसली. समोरच्या सोफ्यावर संजय झोपला होता. हा माणूस इथे का झोपला होता ? डॉक्टर म्हणाला होते की हा त्यांचा सहकारी आहे म्हणून. पण हा माझ्या खोलीत का झोपला आहे ? आणि नारायणराव  कुठे आहेत ? खरं तर त्यांनीच इथे असायला हवं होतं. ती खोलीच्या बाहेर आली. समोरच सिस्टर लोकांचं डेस्क होतं. “सिस्टर माझ्या खोलीत कोण माणूस झोपला आहे ? असा कसा तो इथे आला ?” करुणाने तक्रार केली. सिस्टर चक्रावून गेली. ती खोलीमध्ये धावली. “अहो मॅडम हे तुमचे