रात्र खेळीते खेळ - भाग 10

  • 7.5k
  • 3.6k

ती पाच जण तिथून पळून जाणार तोच समोर तो माणूस चिडलेल्या स्वरूपात उभा होता आणि त्याची बायको सुद्धा शुद्धीवर आली होती. बाकिची मुल तिथून कधीच पसार झालेली त्यामुळे त्या माणसाच्या चेहऱ्यावर प्रचंड राग दिसून येत होता या सगळ्यांना खाऊ कि गिळू अस झालेल त्यांना.... ती सगळी तर पुरती गोंधळून गेली आता पुढे काय करायच हेच त्यांना कळेना..... मागून पळाव तर त्या माणसाची बायको त्यांना पकडायला जवळ येत होती.. आणि पुढून तो माणूस पुढे पुढे सरकत होता... ते विचारातच हरवले होते....तोवर तो माणूस त्यांच्या जवळ जवळ येवू लागला.. त्याने मागे घेतलेला हात पुढे केला तर त्याच्या हातात एक चाकू दिसत होता