येवा कोंकण आपलोच असा.. - भाग ४

  • 6.6k
  • 2.2k

येवा कोंकण आपलोच असा... मालवण डायरी भाग ४ किल्ला बघून बोटीने परत येईपर्यंत सूर्यास्त होत आला होता.रूमवर येऊन थोड फ्रेश झाले आणि त्याला भेटायला चार पावलं चालत किनाऱ्यावर आले.. आता निवांत बसून त्याच्याशी गुजगोष्टी करायच्या होत्या ..सूर्यदेव अस्ताला गेले होते.त्यांचा लालिमा स्वतःच्या अंगावर घेत तो शांतपणे फेसाळत लाटांच्या रुपात माझ्याकडे किनाऱ्यावर येत होता. संध्याकाळच्या थंडीत माझ्या पायांना होणारा त्याचा गरम स्पर्श मला सुखावत होता..असं नुसतचं त्याला बघणंही कितीतरी सुंदर वाटत होतं.फक्त नजरेचा नजरेशी चाललेला मूक संवाद..काहीही न बोलताही मन हलकं हलकं झालं होतं..साऱ्या दूनियाचा कचरा, निर्माल्य, पाप आपल्या पोटात सामावून घेणारा तू..माझ्या मनातील खळबळही स्वतः मध्ये सामावून घेतोस आणि प्रत्येक