आरोपी - प्रकरण ९

  • 8.9k
  • 4.6k

प्रकरण ९ दुपारी साडे तीन ला सौम्या ने पाणिनी च्या केबिन मधे आलेला रिसेप्शनिस्ट चा फोन उचलला. “ क्षिती बाहेर आल्ये.” “बोलव तिला आत,सौम्या.” आत आल्यावर क्षिती हसून पाणिनी ला म्हणाली, “राजे साहेबांनी सांगितलं की तुम्ही मला भेटायला सांगितलंय म्हणून. काय झालंय अचानक?” “ मी आणि कनक ओजस एक छोटी ट्रीप करून आलो आत्ता.” पाणिनी म्हणाला. “ आपल्या प्रकरणा संदर्भात?” “ अर्थात.” “ काय प्रगती झाल्ये , काही नवीन बातमी समजल्ये?” “ त्या आधी मला, काही प्रश्न विचारायचे आहेत तुला.” पाणिनी म्हणाला. तिने संमती दर्शक मान हलवली. “ आज तुझं आत्याशी बोलणं झालंय?” तिने मान हलवून नाही म्हणून सांगितलं. “