रक्त पिशाच्छ - भाग 16

  • 4.3k
  • 2.1k

लेखक:जयेश झोमटे (जेय) भाग 16 छोठी मधु म.रा ताराबाईंच्या खोलीतुन बाहेर पडली , उड्या मारत- तर कधी स्वत:च्या हाताची बोट मोजत ती पुढे-पुढे जात होती. मधुच्या दोन्ही तर्फे खोल्या लागत होत्या- खोल्यांच्या दारांना वेग-वेगळ्या रंगाची काच बसवली होती. आणी सर्व दार बंद होती..त्या प्रत्येक दाराबाहेर एक गोल स्टूल ठेवला होता..स्टूलवर कुठे फुलदानी ठेवलेली,तर कुठे काचेच्या महागड्या वस्तू होत्या. खाली काळ्या-सफेद डिझाइनची विशिष्ट प्रकारची फरशी होती. त्यावरुन लहानगी मधु आपल्याच तंद्रीत चाललेली. की तेवढ्यातच तिच्या कानांवर एक ओळखीची हाक ऐकु आली. ..मधु..! मधुने आवाजाच्या दिशेने पाहिल समोर यु:रुपवती होती. रुपाताई! मधु जराशी गाळात हसली.