रक्त पिशाच्छ - भाग 18

  • 5.3k
  • 2.5k

18 भाग 18 राहाजगड जंगलातल्या कालजल नदीच्या दुस-या टोकावर महाराज, रघुबाबा, यार्वशी प्रधान, कोंडूबा, आणी त्यांच्या मागे हातात तलवार, भाला, अंगावर चिळखत लावुन सैनिक उभे होते. चला महाराज ..! रघुबाबा म्हंणाले.तसे त्यांच्या ह्या वाक्यावर महाराजांनी फक्त होकारार्थी मान हलवली ! पावले वाढवुन सर्वजन गुहेच्या दिशेने निघाले, ज्यात तो सैतान गाढ निद्रेत झोपला होता?सहज एकाचवेळेस दहा-बारा जन सोबत चालु शकतील अशी वाट होती ती .डावी-उजवीकडे मोठ मोठ्या झाडांच्या सजीव आकृत्या उभ्या होत्या.आणि त्या झाडांमधुन गेलेल्या पायवाटेतुन सर्वजन चालत निघालेले.त्या विशाल हिरव्याजर्द झाडांच्या जाडजुड फांद्यांवरच्यां पानांनी सुर्याचा प्रकाश रोखुन धरला होता -ज्याने खाली अंधार व थंडी पसरली होती.काहीवेळातच सर्वजन त्या