रक्त पिशाच्छ- भाग 26

  • 5k
  • 2.2k

भाग 26दुपार दोन वाजता राहाजगड महालात , युवराजांची खोली.युवराज सुरजसिंह यांच्या खोलीत पलंगावर मेघावती डोळे मिटुन पडली होती. तिच्या बाजुला युवराज बसलेले,त्यांच सर्व लक्ष तीच्या चेह-यावर होत. मेघावतीच्या चेह-याकडे पाहणा-या युवराजांच्या चेह-यावर चिंतेच्या छटा उमटल्या होत्या..आणिका नाही उमटणार? मेघावतीच्या गर्भात त्यांचा वंश जो वाढत होता..अद्याप त्या वंशाने ह्या धरतीवर जन्म ही घेतला नव्हता ,आपल्या आई -वडिलांना पहिलही नव्हत! जर त्या सैतानाच्या कचाट्यात सापडुन बाळाला, त्याच्या आईला काही झालं असत तर? युवराजांच्या मनात वाईट प्रश्ण उभे राहत होते. युवराज एकटक मेघावतीच्या चेह-याकडे पाहत बसलेले .की तेवढ्यात मेघावतीच्या बंद पापण्यांआडून डोळ्यांची हालचाल झाली..मग मेघावतीने हलकेच डोळे उघडले.डोळे उघडताच तिला आपल्याकडे