रक्त पिशाच्छ - भाग 28

  • 4.1k
  • 1.7k

भाग 28 आकाश ...त्या आकाशातले ढग सर्वकाही लाल रंगाचे दिसुन येत आहेत. जणु त्या आकाशात, ढगांच्यात रक्तनी रक्त भरल आहे.जर कधी त्या ढगांमधुन पाण्याचा वर्षाव झाला, तर ढगांमधुन पाणि नाहीच तर रक्त पडेल रक्त! तो गोलाकार चंद्रही रक्तासारखा लाल भडक दिसत आहे आणि त्या गोलाकारा चंद्रा बाजुलाच........................एका उंचकड्यावरती तो भव्य -दिव्य रक्तांचल महाल दिसत आहे. मोठ-मोठाल्या काळसर दगडी चुन्यांच्या बांधकामाने उभारलेला भक्कम असा सैतानाचा महाल.महालाच्या पुढच्या भिंतींवर असंख्य काचेच्या खिडक्या आहेत. त्या खिडक्यांमधुन मेंनबत्त्यांचा पेटलेला प्रकाश दिसत आहे.महालाच्या ठिक मधोमध एक बाराफुट उंचीचा दोन झापांचा चौकलेटी रंगाचा लाकडी दरवाजा आहे. दरवाज्याच्या दोन्ही डावी-उजवीकडे दोन मशाली घेऊन उभे असलेले