ऋतू बदलत जाती... - भाग..6

  • 6.6k
  • 3.6k

ऋतू बदलत जाती...६ "जशी तुमची इच्छा...."म्हणत जानकी मात्र पुढे चालू लागली .आणि तो पाठीमागे वाघाला खेचत...आणि त्याच्या पाठी वैदेही... ***** आता पुढे.... जंगलातून वाट काढत ते पुढे जात होते अजूनही पहाट व्हायला बराच वेळ होता. "हे वीर... आम्हाला तुमच्याबद्दल बरेच कुतुहल जाणवत आहे... तुम्ही सांगू शकाल का तुमच्याबद्दल ..?.. वैदेही बोलली ती त्याच्या मागून चालत त्याच्या देहबोलीचे निरीक्षण करत होती. "आम्ही राघवेंद्र.. सोनगडचे जेष्ठ राजपुत्र तो पुढे बघतच बोलला.." जणू जानकिला त्याला त्याची ओळख सांगायची आहे. "ओह तुम्ही ....!... शुरवीर राघवेंद्र ज्यांच्याबद्दल कुलगुरू आम्हाला नेहमी सांगतात..सोनगडचे भावी सम्राट...."वैदेही आश्चर्याने खूष होत बोलली. "मला ज्ञात नाही ..कुलगुरूंनी तुम्हाला आमच्याविषयी काय सांगितले..