सफर विजयनगर साम्राज्याची... - भाग १

  • 9.5k
  • 5k

आयुष्य हा एक प्रवास आहे..माणसाच्या जन्माअगोदरपासूनच शुक्राणूच्या रुपाने सुरु झालेला त्याचा हा प्रवास मरेपर्यंत सुरुच असतो, अगदी मृत्यूनंतरही आत्म्याच्या रुपात तो सुरुच असल्याची समजूत जनमानसात आहे. एकूणच काय तर माणूस आणि प्रवास हा अविभाज्य घटक आहे. त्यामुळेच की काय, रोजची न चुकणारी कर्तव्ये पार पाडत असताना माणूस आनंद मिळवण्यासाठी, मनावर आलेला ताण हलका करण्यासाठी प्रवास करत असतो. असं मला वाटतं. माझ्याबाबतीत तरी हे तंतोतंत लागू पडतेअशा आयुष्यरुपी प्रवासात एकदा तरी काही ठिकाणं पाहायला हवीत आणि त्या Must visit places मधील एक ठिकाण म्हणजे हंपी..हंपी नुसतं नाव ऐकलं तरी डोळ्यासमोर येतं विजयनगर साम्राज्य !!आपली भारतीय संस्कृती किती महान आहे हे आपल्या