आसाम मेघालय भ्रमंती - 1

  • 9.3k
  • 4.2k

#आसाम_मेघालय भ्रमंती भाग १... असं म्हणतात की प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते, तुम्ही कितीही प्रयत्नवादी असला तरी विशिष्ट वेळ आल्याशिवाय तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडत नाहीत.काहींचे मत वेगळे असू शकते; पण मी तरी माझ्या आयुष्यात अनेकदा या गोष्टीचा अनुभव घेतला आहे.... मी ऑक्टोंबर २०१९ ला स्वेच्छानिवृत्ती घेतली तेव्हा पुढच्या जीवन प्रवासासाठी मनात काही योजना आखल्या होत्या. चाळीस वर्षांच्या धकाधकीच्या धावपळीच्या आयुष्यात प्रथमच आता निवांत वेळ मिळणार होता.मनाप्रमाणे वागता येणार होते वर्षभरापूर्वी ड्रायव्हिंग शिकलो होतो.आता मस्त फिरायचे, देश विदेशात सहली करायच्या.जे जे करायचे राहून गेले आहे असे वाटते ते सर्व करायचे! त्या नियोजनाप्रमाणे निवृत्तीनंतर मिळणाऱ्या आर्थिक लाभाचा पहिला हप्ता बँकेत आलेल्या दिवशीच