#आसाम_मेघालय भ्रमंती५ शिलाँगमध्ये आमच्या सहलीचे तिन्ही दिवस एम क्राऊन या एकाच हॉटेलात मुक्काम होता त्यामुळे लगेज बरोबर घेऊन फिरण्याचा प्रश्न नव्हता. मात्र आज सकाळी सहा वाजताच बॅग्स भरून खोलीबाहेर ठेवल्या. इथे नाश्ता उरकून आज इथून मुक्काम हलवून आम्ही काझिरंगाकडे प्रयाण करणार होतो.बरोबर साडेआठ वाजता आमचा हा प्रवास सुरू झाला.संपूर्ण सहलीतला हा सर्वात जास्त अंतराचा प्रवास होता. एकशे ऐंशी किलोमीटरच्या या प्रवासासाठी चार पाच तास सहज लागणार होते. दुपारी लंचसाठी एका ढाब्यावर ब्रेक वगळता सलग प्रवास झाला.काझिरंगा मधील हिरवाईने नटलेले रस्ते आमच्या स्वागतासाठी सज्ज होते.आता आम्ही काझिरंगामधील वन्य प्राण्यांच्या क्षेत्रातून चाललो होतो त्यामुळे ठिकठिकाणी स्पीड गन लावून वाहन वेगावर नियंत्रण आणले