एका झाडाची गोची - भाग २

  • 7.5k
  • 1
  • 2.7k

मकाजी, मकाजीची आई, त्याची पत्नी झाडामुळे पार मेटाकुटीला आले होते.पण त्यांचा काहीच इलाज चालत नव्हता. झाडा पुढे त्यांनी अगदी त्यांचे हात टेकले होते.आठ दिवसांपूर्वीच मकाजीची मुलगी झाडाच्या खोडाला अडकून पडली होती.तिला इजा झाली नव्हती.पण थोडेफार खरचटले होते. तिला मुका मार लागला होता. त्यामुळे त्याची मुलगी नार्गीमधून मधून वेदनेने कळवळत होती. नार्गीला मकाजीच्या बायकोने डॉक्टर कडे नेऊन आणले होते तरीपण तिला बरे वाटत नव्हते असे त्याची बायको त्याला म्हणत होती. मकाजी ची आई मकाजीची वर जोराने ओरडली, म्हणाली.... हा कोपऱ्यात पडलेला कोयता घे आणि जा बाहेर...ते झाड अगदी मुळापासून पासून तोडून काढ. आताच्या आत्ताच.मकाजिला सुद्धा तसेच वाटत होते. परंतु मुन्शीपार्टी वाले,