कोकण...! एक अनुभव.

(12)
  • 18.5k
  • 6
  • 7.5k

कोकण....!            अथांग सागर, पांढरेशुभ्र समुद्रकिनारे, घाटवळणाचा रस्ता, सह्याद्रीच्या पर्वतरांगा यामुळे कोकण प्रत्येक माणसाच्या मनावर आदिराज्य करून बसलाय. त्यामुळे सुट्टी आली आणि फिरायचा बेत झालाच तर मनात कोकण आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे यावेळीच्या सुट्टीला पण कोकणात च जायचं हेच ठरलं होत. तळकोकणाबद्दल खूप ऐकून होतो पण पाहण्याचा योग कधीच आला नव्हता. गोव्याच्या भूमीला लागून असलेला हा निसर्गरम्य परिसरमालवण. गोवा हे खूप मोठे पर्यटनाचे स्थळ जरी असले तरी त्याहूनही किती तरी सुंदर असलेले, प्रेमळ स्वभावाची माणस असलेले, लोककला, संस्कृती आणि कोकण जपत असलेले हे तळकोकण. त्यामुळे या प्रवासाबद्दल खूप उत्साह होता.          सकाळी लवकर