अंकिलेश - एक प्रेमकथा - 5

  • 5.1k
  • 2.4k

५ @ अखिलेश तिकडून आलो तर खूपच अपसेट होतो मी. नाही म्हटले तरी अंकिता मला आवडली होती. थोडी, नव्हे जरा जास्तच आंग्लाळलेली असली तरी, जब प्यार करे कोई तो देखे केवल मन.. पण शेवटी दुनियादारी पडेगी निभानी. माझे घर, वन रूम किचन. बाबा मिल वर्कर. आई लोणची पापड बनवून विकते. नाही म्हणायला तशी आर्थिक चणचण खूप नाही. दोन वेळेस जेवण आणि कमी असल्याने बाकी गरजा भागवता यायच्या. मी मेडिकलला गेलो त्याचे आई बाबांना कोण कौतुक. तसा मी पहिल्यापासूनच हुशार. खरेतर हुशारीपेक्षा मेहनत महत्वाची. शाळेपासूनच मी नियमित अभ्यास करणारा. त्यात डाॅक्टर व्हायचे स्वप्न पाहिलेले. अगदी जीएस- केईएमसारख्या नंबर वन हाॅस्पिटलामध्ये मिळालेली