अंकिलेश - एक प्रेमकथा - 11

  • 3.2k
  • 1.5k

११ @ अखिलेश टी एन मेडिकल काॅलेजचा मेन लेक्चर हाॅल. स्टेज, वरती वरती अरेंज केलेले बेंचेस. बहुतेक हा नाटकाचा प्रोग्राम बराच प्रसिद्ध असावा. हाॅल तुडुंब भरलेला. नाटक कोणते? तर, 'प्यार किए जा!' क्षणभर वाटले अंकिताने ते नाव मुद्दाम द्यायला लावले की काय! ती काहीही करू शकते.. अर्थात तिला हवे असेल तर.. आणि तरच! हट्टीपणा हा जिद्दी स्वभावाचा बाय प्राॅडक्ट असतोच. तेव्हा ती हट्टी आहेच नि हवे ते मिळवण्यासाठी चिकाटी नि मेहनत करण्याची तिची सवय आहे.. नाटकाला तिने मला बोलावले ते इंटरकाॅलेजिएट नाटक म्हणून, पण तिथे माझ्याशिवाय कुणीच दुसऱ्या काॅलेजातून आलेले नव्हते. येणार कसे? हे आमंत्रण फक्त माझ्यासाठी.. पर्सनल होते! ती