अंकिलेश - एक प्रेमकथा - 14

  • 4.4k
  • 2k

१४ @ अखिलेश अंकिताला दर आठवड्यात भेटण्याचा मस्त प्लॅन तयार झाला म्हणून मी खूश झालो. कैलास त्या दिवशी कँटिनमध्ये माझी वाट पाहातच होता. म्हणजे तो शादी किसीकी भी हो.. अपना दिल गाता है म्हणायचा. "तो क्या? उनसे मुलाकात हुई? बादमें जाने क्या हुवा? न जाने क्या बात हुई?" "नाटक चांगले होते.." "डोन्ट टेल मी, तू नाटक बघायला गेलेलास! उगाच ताकाला जाऊन भांडं लपवतोय.. चेहऱ्यावर स्पष्ट दिसते सारे.. चेहरा एक आइना होता है.. और हम उसका मुआइना करते हैं. तुरंत अंत.." "गप रे.." "या चार लाइन्स ऐक.. मग गपतो.. नाटक देखने के बहाने  मैं चुपकेसे आया दरपर तेरे वापस तो आया