अंकिलेश - एक प्रेमकथा - 32

  • 3.7k
  • 1.7k

३२ @ डाॅ.अरूणा गावस्कर आयुष्याची ही गंमत असावी. आज गंमत शब्द वापरतेय मी.. तेव्हा इट वाॅज टफ. म्हणजे एका डोळ्यात आनंदाचे अश्रू आले की दुसऱ्यात संकटामुळे पाणी यायलाच हवे असा माझ्या बाबतीत नियतीचा काही नियम असावा की काय? माझे सुरेन्द्रशी लग्न ठरले.. सगळे ठरवले त्यानंतर लगेच सुरेन्द्रच्या वडलांनी इहलोक सोडावा? अंकिताच्या जन्माच्या आनंदाच्या वेळी सुरेन्द्रचा गावच्या घरावरील हक्क जाण्याचा निकाल यावा? माणसाचं मन उगाच या योगायोगांमध्ये लिंक जोडत असतं. पण इजा बिजा नंतर तिजा अशा वेळी व्हावा? ते ही अंकिताबाबत? सुरेन्द्र मोठ्या मुश्किलीने तयार झालेला तिच्या लग्नाला, त्यात त्याच्या भास्कराचार्य पंडित गुरूजींचा सल्ला महत्वाचा होता. माझ्यासाठी अखिलेश अंकिताला सांभाळेल याची