अंकिलेश - एक प्रेमकथा - 36

  • 2.7k
  • 1.1k

३६ @ अखिलेश बिचारी अंकिता. ज्या वयात पोरींना दिसण्यातली गंमतच महत्वाची वाटायला लागते त्या वयात विद्रुप होण्याचं नशिबी आलं. ते कोड वाढत गेलं. नि दोन वर्षात चेहराही त्याच्या तडाख्यात आला. एकसंध रंग पांढरा झाला तर एकवेळ ठीक, पण थोडा थोडा कमी जास्त झाला की अधिक विचित्र दिसतो. दररोज उठून आज डाग कुठवर आलाय हे बघायची सवय झाली तर मनावर परिणाम होणारच. कितीही म्हणा, दिसण्यापेक्षा असणे महत्वाचे, पण ज्याला त्यातून जावे लागतं त्याची मनोवस्था कठीण आहे समजणे. लग्नाआधीच्या दोन वर्षात अंकिताला बऱ्यापैकी सांभाळून घ्यावे लागले. हळूहळू ती त्यातून सावरली. आता तर तिला त्याचे काही वाटेनासे झालेय. खरे सांगू ना तर हे