अंकिलेश - एक प्रेमकथा - 37

  • 3.8k
  • 1.5k

३७ @ डाॅ.अरूणा गावस्कर त्या दिवशी अखिलेश डिपार्टमेंटमध्ये भेटायला आलेला. बिचारा परेशान झालेला. अंकिताचा पत्ता नाही. इकडे अंकिता घरात कोंडून घेतल्यासारखी बसलेली. माझा अंदाज खरा होता, तिला अखिलेशवर जबरदस्ती करण्यापेक्षा त्याच्यापासून दूर जायचे होते. तिचा हा कोडाचा आजार म्हणजे अगदी नको तेव्हा टपकलेला. कसा किती पसरेल ठाऊक नसताना.. "ममा, व्हाय मी? आय ॲम नाॅट फेअर. लहानपणापासून ह्या स्कीन कलरशी ॲडजस्ट केलं. आय लर्न्ट टू गेट ओव्हर इट. आता कुठे आय ॲक्सेप्टेड इट तर हे? डायरेक्ट डिपिगमेंटेशन? हाऊ वियर्ड विल आय लुक? माझ्याच मागे का लागलेय हे सगळं?" तिच्या सगळ्या प्रश्नांना माझ्याकडे काय उत्तर होतं? स्वत: मी काही फारशी गोरी नाही.