सफर विजयनगर साम्राज्याची... - भाग ७

  • 5.7k
  • 2.1k

विरूपाक्ष मंदिरातून बाहेर पडलो आणि पोटपूजा करायला गेलो.. त्याआधी तिथल्या लोकल मार्केट मध्ये थोडी खरेदीही केली. इथे हंपी मधील स्थळांचे चित्र असलेले टी शर्ट वाजवी दरात मिळतात.. सांगताना दुकानदार दुप्पट किंमत सांगतात, आपण योग्य घासाघीस केली की अर्ध्या किमतीत देतात..जेऊन परत रूमवर आलो. पहाटे लवकर सूर्योदय बघण्यासाठी मातंग टेकडी चढून जायचे असल्याने जास्त वेळ न काढता सरळ झोपून गेलो..पहाटे साडेचार वाजता गजराने आपलं काम चोख केलं. पटापट आंघोळ उरकून आम्ही सगळे तयार झालो.मातंग टेकडीच्या पायथ्यापर्यंत आम्ही रिक्षाने जाणार होतो व तिथून पाऊण तास ट्रेक करून टेकडीच्या माथ्यावर पोहोचता येते..बाजारपेठेपासून टेकडीच्या पायथ्याशी रिक्षाने जायला साधारण दहा मिनिटे लागतात.आम्ही अगदी वेळेत माथ्यावर