कूछ पाने के लिये कूछ ना कूछ खोनाही पडता है! - भाग 1

  • 11.2k
  • 4.6k

रसिका लहानपणापासूनचं अतिशय तल्लख बुद्धी आणि जात्याच हुशार असणारी मुलगी.तिच्या या गुणांची छाप तिच्या पालकांना आणि शिक्षकांना अगदी शालेय जीवनापासून ते ती मेकॅनिकल इंजिनिअर होईपर्यंत दिसून येते.मुंबई आय आय टी मधून डिस्टिंक्शन मध्ये पास होऊन कॉलेज कॅम्पस इंटरव्ह्यू मधून नामांकित आंतरराष्ट्रीय कंपनीत तिला गलेलठ्ठ पगाराची मिळालेली नोकरी, यावरून तिच्या कठोर परिश्रमाची आणि बुद्धिमत्तेची कोणालाही कल्पना येईल..कॉलेजमध्ये असताना तिच्याच वर्गात शिकणाऱ्या कुणालशी तिची ओळख होते काय आणि ओळखीचं रूपांतर प्रेमात होत काय.. दोघंही आपापल्या घरी सांगतात. घरून कसलाही विरोध होत नाहीं .अगदी थाटामाटात त्यांचं लग्न पार पडतं. कुणालची आई शिक्षिका पण आता सेवानिवृत्त असते.. मोठा भाऊ आणि वहिनी दोघंही नोकरी करणारे.