आंबेटाकळीची आमराई

  • 8.5k
  • 4.7k

"मलाही लिहिता येते पण वेळच मिळत नाही' असं एखाद्या माणसानं म्हटलं की, तो धादांत खोटा बोलतो असे समजावे. कंड असला की, माणूस वेळ काढतोच.. मग त्याला योग्य वातावरण लागत नाही, मूड लागत नाही. जनार्दन गव्हाळे हे अशाच बिझी लेखकापैकी एक आहेत. ते मूळचे पत्रकार आहेत. पत्रकाराचे जीवन हे ढोरडॉक्टरसारखे असते. फोन आला की चालले..अॉफिसात गेल्यावर बातम्या लिहा..टाईप करा.‌. आलेल्या बातम्या एडिट करा, पानं लावा.. अशाही घोरात त्यांनी 'आंबेटाकळीची आमराई' हे आठवणींचं पुस्तक लिहून काढलं. या पुस्तकात बालपणीच्या आठवणी आहेत. आपल्या सब कॉन्शीयस माईंडमधून त्यांनी हुडकून काढल्या. ह्या आठवणी म्हणजे काही फुसाळ्या नाहीत, तर जे अनुभवलं..जे भोगलं ते शब्दात मांडलं. जी