कूछ पाने के लिये कूछ ना कूछ खोनाही पडता है! - भाग 2

  • 7.1k
  • 3.4k

समोर इंटरव्ह्यू घेण्यासाठी बसलेली स्त्री आनंदी पाटील असते. रसिकाच्या अगोदरच्या ऑफिसमधील ज्युनियर असते. जिणे एके काळी रसिकाच्या हाताखाली काम केलेलं असते. तिचा हातात रसिकाची बायोडेटा फाईल असते. रसिकाला पाहताच ती कुत्सित हसते.तिला पाहून न पाहिल्यासारखं करते आणि परत तिच्या फाईल बघण्यात गुंग होते."मे आय सीट मॅडम""ओ.. येस येस, यू कॅन""मी पाहिली तुमची फाइल, तुमची मागील रेकॉर्डस् खूप चांगली आहेत. पण तुम्ही जो पाच वर्षाचा गॅप घेतलात त्यामुळे आता तुमच्या सध्याच्या काम करण्याच्या क्षमतेवर कंपनी कसा विश्वास ठेवणार. आम्हाला या पदासाठी खूप अनुभवी आणि कार्यक्षम व्यक्ती हवी आहे.तुम्ही हुशार आणि कार्यक्षम आहात हे मी माझ्या वैयक्तिक पातळीवर सांगू शकेन पण नोकरीत