कूछ पाने के लिये कूछ ना कूछ खोनाही पडता है! - भाग 3

  • 6k
  • 2.5k

कुणाल पुरता जाणून होता की बाळासाठी रसिकाने तिचं करियर पणाला लावलं होतं. तिनं नोकरी सोडून घरी बसण्याचा निर्णय घेतला होता. आपल्या करीयरच्या उच्च बिंदूवर असताना नात्यांसाठी एवढा मोठा त्याग करण्यासाठीही धैर्य आणि समजूतदारपणा लागतो. तो रसिकाने दाखवला म्हणूनच आज त्यांचं बाळही निरोगी आहे आणि कुणाल स्वतः हा त्याच्या करियरमध्ये प्रगती करू शकला.याचा अर्थ आज त्यांच जे हसतं खेळतं आणि सुखी कुटुंब आहे त्याचं बऱ्यापैकी श्रेय रसिकाला जातं.आज पुन्हा ती आपल्या करिअरची नवीन सुरवात करू पाहत आहे. अशा वेळी आजच्या सारखं अनुभव तिला येतच राहणार आहेत. पण तिनं निराश न होता याचा सामना करायला हवा.खूप विचाराअंती त्यानं ठरवलं की एक दोन