मनोगत एका सासूचे...

  • 12.3k
  • 4.4k

म्हणता म्हणता आज माझ्या मुलाच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण झालीत. आणि दोन वर्षांपूर्वीचा काळ माझ्या डोळ्यांसमोर आला. वास्तविक तेव्हा कोणतेही त्याच्या लग्नाचे प्रयोजन नव्हते. पण अचानक त्याने मुलगी आमच्या समोर उभी केली आणि पाच सहा महिन्यात तो बोहल्यावर चढला. खरंतर मला बाई एवढ्यात सासुबाई व्हावयाचे नव्हते . सारखे वाटत होते की आपण मस्त संपूर्ण घरावर स्वतंत्रपणे राज्य करत आहोत, आता मुलाच्या लग्नानंतर लुडबूड करायला कोणी तरी येणार!!!बरं मुलाला म्हटले की तुम्हाला वेगळा फ्लॅट घेऊन देतो तिथे तुम्ही संसार थाटा. पण छे! मुलगाही या गोष्टीला तयार झाला नाही आणि त्यापेक्षा जास्त सून ही तयार नव्हती. शेवटी मनाची तयारी केली आणि सासूच्या