पडद्यामागचा खरा हिरो

  • 7.1k
  • 2.7k

नमस्कार मंडळी. 1 जानेवारी 2023 , नवीन वर्षांचा पहिला दिवस आणि त्यासोबत डबल धमाका म्हणुन रविवार , रविवार आला  म्हणजे हक्काचा सुट्टीचा दिवस. त्यामुळे आई बाबा, मुलं आणि पत्नी असे आम्ही सर्वजण एकत्र असण्याचा  दिवस. नाही तर इतर दिवशी आम्ही जॉब वाले आमच्या कामात व्यस्त , आई बाबा त्यांच्या ओल्ड एज सोसायटी ग्रुपमध्ये व्यग्र , आणि बायकोची मुलामागे धावण्याची लगबग.या सर्वातून रविवार हा एक दिवस कुठे आमच्या वाटय़ाला येतो , आणि मग मी त्याचा पूरेपूर आनंद घेण्याचा प्रयत्न करतो. दुपारची जेवणं आटोपल्यावर एक छानसे पुस्तक माझ्या हातात पडले….आणि ते वाचता वाचता अचानक एक ओळ समोर आली “स्वामी तिन्ही जगाचा आईविना