मृण्मयीची डायरी - भाग २

  • 6.2k
  • 3.3k

मृण्मयीची डायरी भाग २रा.मागील भागावरून पुढे…तारीख… १६/६/१९८८इतरांचं जाऊ दे आईनी पण कधी गंभीरपणे माझी दखल घेतली नाही. वैजुताई आणि सारंग दादा सारखं मलापण माझी मतं आहेत हे तिला कळतच नव्हतं.मला वाटायचं माझ्याजवळ आईनी येऊन बसाव.प्रेमानी डोक्यावरून हात फिरवावा.पण असं कधीच झालं नाही.मग दादा,ताईंच्या डोक्यावरून कशी येता जाता हात फिरवायची. त्यांचा गालगुच्चा घ्यायची. माझ्यावेळी तीला हे आठवलं नाही कधी.आई जेव्हा दादा ताईचे लाड करायची तेव्हा ते मी आधाशासारखं माझ्या डोळ्यांनी पिऊन घ्यायचे.तारीख...१५/६/१९८८मला नेहमीच सगळेच मंदच समजत आले.मला ओरडून सांगावं वाटलं की मी मंद नाही. मी इतरांसारखी हसू शकते, रागाऊ शकते, बोलू शकते.मला सगळं येतं पण मला दादा ताई सारखं खूप बडबड