मृण्मयी ची डायरी भाग ६वामागील भागावरून पुढे…वैजू काऊंन्सलर अमीता पटवर्धन यांना फोन करून त्यांची वेळ आणि पत्ता विचारून घेते."सारंग ऊद्या संध्याकाळी पाच वाजता या म्हणाल्या. आपण दहा मिनीटे आधी पोहचू असंच घरून निघू. पहिलीच वेळ आहे आपल्या भेटीची उगीच उशीर नको व्हायला.या ट्रॅफिकचं काही सांगता येत नाही." वैजू सारंगला म्हणाली."हो बरोबर बोलते आहेस.आपल्या या मिटींगबद्दल आई- बाबांना सांगायची काही गरज नाही.""अर्थातच नाही.का सांगायचं? त्यांना मुळी पटत नाही आपण जे करतोय ते.मग कशाला सांगायचं?"" हं. चार सव्वा चारलाच निघू आपण.""हो. मृण्मयीची डायरी आणि चित्रांची वही दोन्ही बरोबर घेऊन जायला हवं.मी आत्ताच दोन्ही गोष्टी माझ्या पर्समध्ये ठेवते नाहीतर विसरेन." वैजूनी मृण्मयीची डायरी