जेव्हा डोळे कमी आणि मन जास्त रडत…

  • 12.1k
  • 1
  • 3.9k

नमस्कार मंडळी नऊ महिने नऊ दिवस एका छोट्याशा जीवाला जन्म घेण्यासाठी आईच्या गर्भात नऊ महिने नऊ दिवस वेळ घ्यावा लागतो , तेव्हा कुठे तो मासाचा एक गोळा पूर्णपणे आकार घेऊन जन्माला येत असतो. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये बाळाचे सर्वात पहिले अवयव म्हणजेच ऑर्गन निर्माण होत असेल तर ते म्हणजे त्याचे “हृदय”. तिसऱ्या ते चौथ्या आठवड्यात हे हृदयाचे ठोके आईच्या गर्भात वाजायला लागले की समजावे एक नवा जीव तिच्या गर्भात आकार घ्यायला सुरुवात करत आहे आणि मग तिथून पुढे निसर्ग नियमाप्रमाणे एक एक अवयव निर्माण होऊन नऊ महिन्यात हे गोंडस बाळ जन्माला येते. हा एक नैसर्गिक चमत्कारच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार