मथुआजी आमची नाशिकला बदली झाली. थोडा आनंद, थोडे कुतूहल. नवीन गावाबद्दलची साशंकता या सगळ्या सकट आम्ही नाशिकला येऊन पोहोचलो. नवीन फ्लॅट छानच होता. आजुबाजूला तुरळक वस्ती दिसत होती. समोर थोडं दुरवर बंगल्यांची रांग दिसत होती. शेजारी बिटको फॅक्टरी. बंगल्यांच्या भोवती हिरवळीचं अपार सुख दिसत होतं. फॅक्टरीच्या आवारात वटवृक्ष नांदत होते. हळूहळू बस्तान बसून