मॅनेजरशीप - भाग १

  • 9.4k
  • 1
  • 5.6k

मॅनेजरशीप भाग १   गुरुवारी त्या दिवशी नेहमी प्रमाणे कंपनी ला  सुटी होती. तरी पण मधुकर ऑफिस ला आला होता. प्रॉडक्शन, परचेस, सेल्स आणि प्लॅनिंग डिपार्टमेंट च्या लोकांना पण बोलावलं होतं. कंपनी एक मध्यम आकाराची फाऊंडरी होती. मधुकरला या कंपनीत जनरल मॅनेजर च्या पदावर येऊन जेमतेम ३ - ४ महिनेच झाले असतील. आता पर्यन्त सर्व बाबी समजून घेण्यातच वेळ गेला होता. आता यापुढे त्याचं काम सुरू होणार होतं.  कंपनीच्या एकंदरच कामकाजा बद्दल आणि प्रगती बद्दल डायरेक्टर लोक बरेच नाराज होते. माधुकरची ख्याती ते ऐकून होते म्हणून त्यांनी त्याला बोलावून घेतलं होत. त्यामुळे त्याच्यावर फार मोठी जबाबदारी होती. त्यानी मनात बरेच