मॅनेजरशीप - भाग २

  • 6.7k
  • 4.1k

मॅनेजरशीप भाग २ भाग 1 वरुन  पुढे वाचा ..   चक्रवर्ती गेल्यावर शिंदे मधुकर ला म्हणाला “सर, तुम्ही उगीच त्याच्याशी पंगा घेतला. तो फार वाईट माणूस आहे. परत आपले डायरेक्टर सुशील अग्रवाल यांच्याशी त्याचे जवळचे संबंध आहेत. तो आता त्यांच्या कानाशी जावून लागेल. तुम्हाला आता त्रास होणार बघा.” “ते बघू आपण. तुम्ही नका टेंशन घेऊ.” असं बोलून मधुकर ऑफिस ला आला. नंतरचे आठ दिवस शांततेत गेले. चक्रवर्ती surprisingly दुसऱ्या दिवशी येऊन माफी मागून गेला होता. आणि पूर्ण वेळ कामात लक्ष देत होता. मधुकरला वाटलं होतं की तो काहीतरी गडबड करेल पण झालं उलटच. तो एकदमच सिधा झाला होता. शांत झाला