मॅनेजरशीप - भाग ६

  • 3.9k
  • 2.2k

मॅनेजरशीप  भाग ६ भाग ५  वरुन पुढे वाचा ........   “हॅलो धवन, सुशील बोल रहा हूं. इथे मोठाच घोटाळा झाला आहे.” - सुशील बाबू. “काय झालं ? इतकं अप्सेट व्हायला काय झालं ?” – धवननी विचारलं. सुशील बाबूंनी मग दिवसभरात काय काय घडलं त्याचा पाढा वाचला. ऐकल्यावर धवन विचारात पडला. “सुशील मुझे जरा सोचने दो. I will call you back.” – धवन “जलदी सोचो भाई. लक्ष्मी मेटल बंद व्हायची वेळ आली आहे.” – सुशील बाबू.  “मी फोन करतो.” – धवन  धवन विचारात पडला. स्क्रॅप मधून tungsten आणि molubdenum परत मिळवणं हे एक चांगलच फायदेशीर काम होतं. आणि windmill hub चे