मॅनेजरशीप भाग ७ भाग ६ वरून पुढे वाचा. “ठीक तर मग.” मधुकरनी फायनल सांगितलं. “शक्यतो आजच गेल्या वर्षभरातले आकडे तयार करून या म्हणजे आपल्याला काही महत्वाचे निर्णय घेता येतील. आणि हो तुम्ही कसल्या कामात गुंतले आहात हे कोणालाही कळू देऊ नका. भिंतीला कान असतात हे लक्षात घ्या.” “ठीक आहे साहेब.” आणि मीटिंग संपली. संध्याकाळी पुन्हा मीटिंग भरली. सातपुते साहेबांनीच बोलायला सुरवात केली. “साहेब, तुमचा संशय खरा ठरला. स्क्रॅप आणि वापस आलेलं मटेरियल यांचं composition जुळतं आहे.” – सातपुते. “मग याचा काय अर्थ काढला तुम्ही ?” – मधुकर. “आपलं मटेरियल आपण लक्ष्मी मेटल मध्ये जॉब वर्क ला पाठवतो आणि तेथूनच