मॅनेजरशीप - भाग १२

  • 4.3k
  • 2.5k

मॅनेजरशीप भाग  १२ भाग ११    वरून पुढे वाचा.....   मेघना त्याच्याच कडे बघत होती. त्याच्या चेहऱ्यावरचे फेरफार तिला कळले आणि ती अवघडून गेली. सुखावली पण. तसंही मधुकरच्या सान्निध्यात जास्तीत जास्त कसं राहता येईल याच साठी तिचे प्रयत्न असायचे. सुरवातीला तिच्या बाबांनी तिला मधुकरला अटेंड  करायला सांगितलं तेंव्हा तिला जरा रागच  आला होता. ती म्हणाली सुद्धा तिच्या बाबांना की मला तर तुम्ही नर्सच बनवून टाकलं आहे. पण हळू हळू परिस्थिती वळण घेत होती आणि तिला ते वळण हवं हवस वाटत होतं. पण मधुकरकडून काहीच प्रतिसाद नव्हता. आता जेंव्हा मधुकरची अवस्था तिने पाहिली तेंव्हा ती एकदम सुखावून गेली. पण तेंव्हाच तिला कळलं