रात्र खेळीते खेळ - भाग 19

  • 7.4k
  • 3.4k

पाऊस चालूच असतो पण त्यासोबत मोठ वादळ येत कावेरीने ठेवलेला दगड एक काळी सावली जमिनीपासून वर स्वतः कडे खेचून घेते त्यासोबत ती ने लिहिलेली अक्षर पुसली जातात.. ते थोड्या अंतरावर जातात आणि वीर व अनूश्रीला आवाज देवू लागतात पण ते आलेले वादळ आणि पावसाचा वाढलेला जोर यातून त्यांचा आवाज कदाचित त्यांच्यापर्यंत पोहोचतच नसतो‌. ते परत हाक मारून एकदा परत जावून बघाव म्हणून मागे वळतात. आणि मोठ्या काळजीत पडतात कावेरीला अधिराज दिसतच नाही कोठे ती खूपच घाबरते अरे अचानक हा अधी कोठे गेला आताच तर आम्ही बोललो... अधिराजही जस मागे वळतो तस त्याला धक्का बसतो त्याला कावेरी दिसतच नाही त्याच्या मनातही