३८ @ अंकिता इतक्या वर्षांनी ही सारी कथा आठवताना परत तरूण झाल्यासारखं वाटतं. तरूण म्हणजे त्या काॅलेजच्या दिवसांसारखं. अगदी यंग ॲट हार्ट! केअरफ्री आणि आॅलवेज लुकिंग फाॅर्वर्ड टू समथिंग. डोळ्यांत सदा स्वप्नं. करियरची नि आयुष्याची. त्यात एका मुलीच्या स्वप्नात येणार तो राजकुमार! मी तशी स्वप्नं विशेष पाहिली नाहीत. कारण घोड्यावरून कुणी राजकुमार येतो यावर माझा विश्वास नव्हताच. आणि आजकाल घोड्यावर कोण बसतं नाहीतरी! पण अखिलेशला पाहून माझ्यात काहीतरी झालं असावं. आय न्यू ही इज द वन चोझन फाॅर मी. तोच एक होता ज्यासाठी मी ते शेकिंग स्टीव्हन्सचे 'यू ड्राइव्ह मी क्रेझी' म्हणू शकत होते.. ॲज इफ आय स्टार्ट फ्लोटिंग इन