रंग तिच्या प्रेमाचा - भाग २

  • 5k
  • 2.6k

त्याच शेवटचं वर्ष यातच जात ...तिचा नकार जरी असला तरी ही तो तिला कायम मदतीला धावुन यायचा...मग एखाद्या विषयच्या नोट्स असु किंवा प्रोजेक्ट..असु तिचा...तो कायम तिला मदत करायचा... कॉलेज मध्ये बापाच्या पैशावर माज न दाखवता तो कायम शिक्षकांच्या मनात आपल्या अभ्यासाच्या प्रगतीतुन लक्षात रहावा हाच त्याचा अट्टाहास ... त्यामुळे शिक्षकांचा तो आवडता विद्यार्थी.... कॉलेज सोडताना त्याने शिक्षकांना तिच्याकडे लक्ष असु द्या सांगितलं आणि त्यांनी ही प्रेमाने होकार कळवला...शिक्षक त्याला दिलेल्या शब्दांप्रमाणे तिच्यावर लक्ष ठेवून होते पण हा ही अधुन मधुन तिची विचारपुस त्यांच्याकडून नकळतपणे करत होता...तिला आपल्या नोट्स त्याने तिच्या मैत्रिणींद्वारे दिल्या होत्या दुसर्या वर्षाच्या ...पण याची काळजी घेत होता