स्पर्शबंध.. जुळले मन बावरे ? - 11

  • 11.1k
  • 2
  • 7k

प्रत्येक वाक्याबरोबर त्याला ' तिची ' आठवण येत होती.त्याने तर तिच्यावर जिवापाड प्रेम केलं होत ना.....त्याच्या जिवापेक्षा त्याने तिला जपल होत पण तिने.....गाण्याच्या प्रत्येक शब्दाने त्याच्या हृदयावर वार होत होते पण त्याला आता त्यांची सवय होती......कारण जखम ही तशीच होती.विराजने पटकन त्याच्या डोळयात आलेलं पाणी पटकन पुसून टाकल...... तेवढ्यात मिष्टीने ही ते पाहिलं होत पण त्याच्या डोळ्यात पाहून तिच्या हृदयात कळ उठली.गाण संपल्यासंपल्या त्याने fm बंद केला.....ह्यावेळी तिनेही त्याला अडवल नाही.थोड्याच वेळात त्याने त्याची गाडी थांबवली आणि बाहेर येत मिष्टीच्या साईडच डोअर ओपन केलं.मिष्टी बाहेर आली आणि समोर बघतच राहिली.समोर मोठ्या अक्षरात भल्यामोठ्या गेटवर ' गोकुळ आश्रम ' अस लिहिलं