लबाडी

  • 6.2k
  • 2.9k

              .... लबाडी ..... ..कॉक्..कोकॉक.. कोss... पहिला कोंबडा आरावला .. आन् धनगाराची आनशी उठली.. बाहेर आली.. आभाळाकडं पाहिलं.. मोग-याच्या फुलावाणी पांढरासुत चांदण्याचा सडा पडला व्हता.. तीन कांडं आन् बाजलं कललं व्हतं . सुक्राची चांदणी चंद्राला पाहून खुदकन हासत व्हती....पण आज आनशीला हासायला येळ नव्हता.. तिचा धनी आंगावर घोंगडं पांघरून बाजल्यावर निवांत झोपला व्हता..आनशीला पाहून बाजल्याखाली आंगाचं मुटकूळं करून झोपल्यालं वाघ्या कुत्रं बाहेर आलं.. मागचे पाय मागं आन् पुढचे पाय पुढं लांब ताणून आळस झटकून आंग मोकळं केलं..शेपूट हालवित आनशीजवळ आलं.. “वाघ्या... उठलास का रं ?.” वाघ्या आणखी जवळ आला.. जोरजोरात शेपूट हालवित तिच्या पायाशी